भरधाव मिक्सरच्या धडकेने दोन जण जखमी
By नारायण बडगुजर | Updated: April 19, 2025 21:11 IST2025-04-19T21:10:25+5:302025-04-19T21:11:29+5:30
- पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.

भरधाव मिक्सरच्या धडकेने दोन जण जखमी
पिंपरी : भरधाव मिक्सरने कारला धडक दिल्याने कारमधील पोलिस कर्मचारी आणि अन्य एक जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री एकच्या सुमारास रावेत येथे घडली.
सहायक पोलिस निरीक्षक कैलास भिकू डाबेराव (वय ५०) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी जितेंद्र कुमार महतो (२३, रा. मामुर्डी, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डाबेराव हे पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.
कारमधून जात असताना रावेत येथे भरधाव आलेल्या मिक्सरने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील श्रीधर भोसले आणि पोलिस कर्मचारी जाधवर हे किरकोळ जखमी झाले असून, कारचे नुकसान झाले आहे.