Pimpari-chinchwad : करसंकलन विभागाने लक्ष्य ओलांडले; तरीही महसूल संतुलनाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:57 IST2026-04-01T12:57:08+5:302026-04-01T12:57:53+5:30

- महापालिकेच्या ५५७७ कोटींच्या उद्दिष्टापैकी ४९१९.५८ कोटींचीच वसुली; इतर विभागांतील तफावतीमुळे एकूण ‘टार्गेट’ अपूर्ण; विभागनिहाय जबाबदारी आणि वास्तववादी लक्ष्यनिर्धारणावर भर आवश्यक 

pimpari-chinchwad Tax collection department exceeds target; still facing challenge of revenue balance | Pimpari-chinchwad : करसंकलन विभागाने लक्ष्य ओलांडले; तरीही महसूल संतुलनाचे आव्हान

Pimpari-chinchwad : करसंकलन विभागाने लक्ष्य ओलांडले; तरीही महसूल संतुलनाचे आव्हान

पिंपरी : आर्थिक वर्षात महापालिकेच्या करसंकलन विभागाने ९०० कोटींचे उद्दिष्ट ओलांडून ९५० कोटींची वसुली करत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. मात्र, काही महत्त्वाच्या विभागांतील कमी वसुलीमुळे एकूण ५,५७७ कोटींच्या उद्दिष्टापैकी ४,९१९.५८ कोटींचीच वसुली झाली असून, अजूनही ६५७.४२ कोटी रुपयांची तूट कायम आहे. त्यामुळे महसूल नियोजनात विभागनिहाय असमतोल अधोरेखित झाला आहे.

महापालिकेच्या आर्थिक धोरणात करसंकलन, बांधकाम परवानगी आणि जीएसटी भरपाई हे प्रमुख महसूल स्रोत मानले जातात. त्यापैकी जीएसटीमधून २३६७.२० कोटी, बांधकाम परवानगीतून ६७६.७२ कोटी, तर करसंकलन विभागातून ९५० कोटींची विक्रमी वसुली झाली. कर विभागाने उद्दिष्टापेक्षा ५० कोटी जादा महसूल जमा केल्यामुळे एकूण तूट लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

दुसरीकडे भांडवली जमा विभागात ३६० कोटींच्या उद्दिष्टापैकी फक्त १०६.५१ कोटी, तर इतर विभागांत आकाशचिन्ह, भूमी जिंदगी, नियोजन विभाग यामध्ये २७२ पैकी १६२ कोटींचीच वसुली झाली. पाणीपुरवठा विभागातही अपेक्षित वाढ न झाल्याने महसूल संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे काही विभागांचे नियोजन प्रभावी ठरले, तर काहींच्या अंमलबजावणीत गती कमी राहिली.

----

अभय योजनेचा फायदा

डिजिटल पेमेंट, थकबाकी वसुली, विशेष नोटीस मोहिमा आणि वर्षअखेरीच्या अभय योजनेमुळे करसंकलनात वाढ झाली आहे. याउलट भांडवली जमा आणि इतर महसूल स्रोतांसाठी प्रकल्पाधारित अंदाज, तिमाही पुनरावलोकन आणि डेटा-आधारित ट्रॅकिंग अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. विभागनिहाय जबाबदारी आणि वास्तववादी लक्ष्यनिर्धारणावर भर दिल्यास महसूल तफावत कमी करण्यास मदत होईल, असा प्रशासकीय निष्कर्ष काढला जात आहे.

-------------

एकत्रित विभागनिहाय महसूल स्थिती (कोटींमध्ये)

विभाग - लक्ष्य - प्रत्यक्ष - जमा - जादा/तूट

जीएसटी भरपाई : २५८२ : २३६७.२० : -२१४.८०

करसंकलन : ९०० : ९५०.०० : ५०.००

भांडवली जमा : ३६० : १०६.५१ : -२५३.४९

बांधकाम परवानगी : ७०० : ६७६.७२ : -२३.२८

पाणीपुरवठा : ११२ : ७७.९४ : -३४.०६

इतर : २७२ : १६२.०० : -११०.००

एकूण : ५५७७ : ४९१९.५८: -६५७.४२

Web Title : कर संग्रह लक्ष्य से अधिक, राजस्व संतुलन अभी भी चुनौती।

Web Summary : पिंपरी के कर संग्रह ने लक्ष्य को पार किया, लेकिन अन्य विभागों में कमियों के कारण राजस्व घाटा बना हुआ है। संतुलित विकास के लिए पूंजी राजस्व और अन्य आय स्रोतों के लिए बेहतर रणनीतियों की आवश्यकता है।

Web Title : Tax collection exceeds target, revenue balance still a challenge.

Web Summary : Pimpri's tax collection surpassed its target, but shortfalls in other departments persist, creating a significant revenue deficit. Improved strategies are needed for capital revenue and other income sources to achieve balanced growth.