शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

pimpari-chinchwad : ‘स्थायी’साठी अपक्ष नगरसेवकाची साथ भाजपला लाभदायी

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 18, 2026 11:58 IST

- पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे ११ सदस्य निश्चित : राष्ट्रवादीचे संख्याबळ चारवर 

पिंपरी : महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता मिळाली. भाजपचे ८४, तर भाजप पुरस्कृत एक अपक्ष निवडून आले आहेत. या अपक्षाची साथ भाजपला स्थायी समितीत लाभदायी ठरणार आहे. अपक्ष सोबत आल्यामुळे स्थायी समितीत भाजपकडून १० ऐवजी ११ नगरसेवकांना सदस्य म्हणून नियुक्ती करता येणार आहे. यामुळे विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा पाचऐवजी चार सदस्य स्थायी समितीवर जाणार आहेत.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये त्या-त्या पक्षांच्या नगरसेवकांना संधी मिळते. भाजपचे एकूण ८४ नगरसेवक, राष्ट्रवादीचे (अजित पवार) ३७, शिंदेसेनेचे ६ आणि १ भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेवक आहेत. नगरसेवकांच्या संख्येप्रमाणे पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीवर भाजपाच्या १० नगरसेवकांना नामनिर्देशित करता येत होते. राष्ट्रवादीला पाच आणि शिंदेसेनेच्या एकाला सदस्य करता नियुक्त करता आले असते. सुरुवातीला फक्त ८४ नगरसेवकांचा गट भाजपकडून नोंदविला होता. परंतु, नंतर ८४ आणि १ अपक्ष असा एकत्रित आघाडीची नोंद भाजपकडून केली आहे. भाजपसोबत अपक्ष आल्यामुळे ही संख्या ८५ झाली आहे. संख्याबळ वाढल्याने भाजपच्या ११ नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. या समीकरणामुळे अपक्षाच्या साथीमुळे पाच वर्षे भाजपला स्थायी समितीत एक सदस्य जास्तीचा देता येणार आहे. राष्ट्रवादीला चार सदस्यांवर समाधान मानावे लागणार आहे. शिंदेसेनेचा एकच नगरसेवक समितीमध्ये असणार आहे.

अधिनियमातील तरतूद काय ?

अपक्षासह ८५ नगरसेवकांचा गट नोंद केल्यानंतर भाजपच्या अकराव्या व राष्ट्रवादीच्या पाचव्या अर्थात दोन्हींसाठी अतिरिक्त एका जागेसाठी दोन्ही पक्षाची स्थिती समसमान आहे. मात्र, महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अकरावा सदस्य भाजपला देता येणार, हे निश्चित आहे. कारण, स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या संख्येबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याबाबत महापालिकेचा निर्णय अंतिम राहील, अशी तरतूद आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे अकरावा सदस्य देण्यास भाजपला कोणताही अडथळा येणार नाही.इतर समित्यांमध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादीचे तीन सदस्य

विधी, शिक्षण, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती या पाच विषय समित्या आहेत. नऊ सदस्यांच्या समितीत भाजपाचे सहा, राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. कमी संख्याबळामुळे विषय समित्यांमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेवकांना संधी मिळणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Independent corporator's support benefits BJP in Pimpri-Chinchwad's Standing Committee.

Web Summary : BJP gains advantage in Pimpri-Chinchwad's Standing Committee with an independent corporator's support. This allows BJP to nominate 11 members, reducing Nationalist Congress Party's representation to four. BJP's majority ensures the eleventh member, solidifying their control. Other committees see a 6-3 split between BJP and NCP.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा