पिंपरीत सिलिंडरचा तुटवडा, काळ्या बाजाराचा सुळसुळाट; गॅसअभावी गृहिणी त्रस्त, व्यावसायिकांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:22 IST2026-03-11T13:22:20+5:302026-03-11T13:22:54+5:30

- अनेक ठिकाणी सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले

pimpari-chinchwad shortage of cylinders in Pimpri, black market flourishing; Housewives suffer due to lack of gas, businessmen in dilemma | पिंपरीत सिलिंडरचा तुटवडा, काळ्या बाजाराचा सुळसुळाट; गॅसअभावी गृहिणी त्रस्त, व्यावसायिकांची कोंडी

पिंपरीत सिलिंडरचा तुटवडा, काळ्या बाजाराचा सुळसुळाट; गॅसअभावी गृहिणी त्रस्त, व्यावसायिकांची कोंडी

- अतुल क्षीरसागर

रावेत : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाल्याने परिसरात सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून, काही ठिकाणी काळ्या बाजारात चढ्या दराने सिलिंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

बुकिंग केल्यानंतर २५ दिवसांनी मिळणार सिलिंडर

सध्या सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना तब्बल २० ते २५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी गॅस संपल्यानंतर गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून, काहींना शेजाऱ्यांकडून किंवा नातेवाइकांकडून सिलिंडर उधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

गॅसअभावी तात्पुरते व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ

व्यावसायिक सिलिंडरवर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, फास्टफूड सेंटर तसेच हातगाडीधारक यांचीही मोठी कोंडी झाली आहे. वेळेत सिलिंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांना आपला व्यवसाय मर्यादित वेळेत चालवावा लागत आहे. काही लहान व्यावसायिकांनी तर गॅसअभावी तात्पुरते स्टॉल बंद ठेवण्याची वेळ आल्याचे सांगितले आहे.

गॅसची चढ्या दराने विक्री...

अधिकृत दराने सिलिंडर मिळणे कठीण झाले असताना काही ठिकाणी दलालांकडून काळ्या बाजारात सिलिंडर विक्री होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. घरगुती सिलिंडरसाठी ५०० ते ७०० रुपये जादा तर व्यावसायिक सिलिंडरसाठी १००० ते १२०० रुपये अधिक आकारले जात असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

बुकिंग केल्यानंतर इतका मोठा कालावधी वाट पाहावी लागत असल्याने रोजच्या स्वयंपाकाचे नियोजन करणे कठीण होत आहे. - रजनी सुतार, गृहिणी

सिलिंडर संपला की मोठी अडचण निर्माण होते. एजन्सीकडे चौकशी केली तर पुरवठा उशिरा होत असल्याचे सांगितले जाते. - दीपाली प्रधान, गृहिणी
 

आमचा पूर्ण व्यवसाय गॅसवर अवलंबून आहे. सिलिंडर वेळेत मिळाला नाही तर दुकान बंद ठेवावे लागते. काही वेळा जादा पैसे देऊन सिलिंडर घ्यावा लागतो.  - गीता प्रधान, हॉटेल व्यावसायिक

Web Title : पिंपरी में गैस की कमी, काला बाजार फलफूल रहा, निवासी परेशान

Web Summary : पिंपरी में गैस सिलेंडर की भारी कमी, घरों और व्यवसायों पर असर। आपूर्ति में देरी से निवासियों को हफ्तों इंतजार करना पड़ता है। काला बाजार बढ़ रहा है, नागरिक परेशान हैं।

Web Title : Pimpri Faces Gas Shortage, Black Market Thrives, Residents Suffer

Web Summary : Pimpri faces severe gas cylinder shortage, impacting households and businesses. Delayed supply forces residents to wait weeks. Black market prices surge, burdening citizens and businesses, disrupting daily life.