फुगेवाडीत ‘अर्बन स्ट्रीट’चा घाट, स्थानिकांमध्ये संतापाची लाट..! ग्रामस्थांचा ‘चक्काजाम’चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:21 IST2026-03-11T14:18:24+5:302026-03-11T14:21:56+5:30

- विकासाला नव्हे, तर विकासाच्या नावाखाली माथी मारण्यात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध

pimpari-chinchwad news the closure of Urban Street in Phugewadi, a wave of anger among locals..! Villagers warn of ‘lockdown’ | फुगेवाडीत ‘अर्बन स्ट्रीट’चा घाट, स्थानिकांमध्ये संतापाची लाट..! ग्रामस्थांचा ‘चक्काजाम’चा इशारा

फुगेवाडीत ‘अर्बन स्ट्रीट’चा घाट, स्थानिकांमध्ये संतापाची लाट..! ग्रामस्थांचा ‘चक्काजाम’चा इशारा

- अमृता दातीर-जोशी 

दापोडी :पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ‘अर्बन स्ट्रीट विकास’ कार्यक्रमांतर्गत फुगेवाडी येथे प्रस्तावित असलेल्या वाढीव पदपथाच्या कामाला स्थानिक नागरिकांनी आता विरोध दर्शवला आहे. आधीच अरुंद रस्ता त्यात हा पदपथाचा घाट काढण्यात येत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

फुगेवाडीला जोडून असणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम आधीच पूर्ण झाले असून, त्यावेळी फुगेवाडीतील स्थानिकांना विस्थापित होण्याची वेळ आली होती. तरीही प्रशासनाला सहकार्य करत ६१ मीटरची मर्यादा पाळून आम्ही १० मीटरच्या पुढे घरे बांधली. अशी सर्व पार्श्वभूमी असताना हे पदपथाचे आरक्षण थेट नागरिकांच्या दारात येऊन ठेपले आहे. त्यामुळे विकासाला नव्हे, तर विकासाच्या नावाखाली माथी मारण्यात येणाऱ्या प्रकल्पांना आमचा विरोध आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर प्रशासनाने मात्र नागरिकांचे हे आरोप खोडून काढत त्या ठिकाणी अतिक्रमणे झाली असून, आरक्षणाानुसारच हे काम होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

यापूर्वीच्या दोनवेळा स्थानिकांनी विरोध केल्यानंतर हा प्रकल्प तात्पुरता स्थगित केला होता. तरीही, याची तिसऱ्यांदा मोजणी करण्याचा घाट घालून प्रशासन नक्की कोणाचे हित साधू पाहत आहे, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. हा प्रकल्प त्वरित रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून ‘चक्काजाम’ आंदोलन करण्याचा इशारा प्रा. मनोज वाखारे यांच्यासह संतप्त फुगेवाडीकरांनी दिला आहे.

२००६ मध्ये आम्ही प्रशासनाला सहकार्य करत जागा उपलब्ध करून दिली होती. आता पुन्हा माझ्याही घरावर खुणा (मार्किंग) करण्यात आल्या आहेत. आमच्यावर दबाव टाकला जात आहे. प्रसंगी आंदोलन करू. परंतु, प्रशासनाची कोणतीही दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही. - लता लगाडे, स्थानिक नागरिक
 

विकासकामांना फुगेवाडीतील ग्रामस्थांनी कायमच सहकार्य केलं आहे. पण, जिथे चुकीच आरक्षण आहे. तिथे प्रशासनाने तडजोडीची भूमिका घेणं अपेक्षित आहे. दापोडीपर्यंत ४५ मीटरचा आणि फुगेवाडीत ६१ मीटरचा पदपथ हा सरळसोट विकासाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय आहे.  - सोपान फुगे, स्थानिक ग्रामस्थ

नगररचना विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत सीमांकनानुसारच येथे कार्यवाही होत आहे. आरक्षित असलेल्या जागेवर नियमावलीचे पूर्णतः पालन करून ही विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत. -  संजय काशीद, कार्यकारी अभियंता, दळणवळण विभाग

Web Title : फुगेवाड़ी में 'अर्बन स्ट्रीट' योजना का विरोध, निवासियों ने दी चक्का जाम की धमकी।

Web Summary : फुगेवाड़ी के स्थानीय लोग 'अर्बन स्ट्रीट' परियोजना के तहत विस्तारित फुटपाथ का विरोध कर रहे हैं, सड़क संकीर्ण होने और विस्थापन के जोखिम का हवाला दे रहे हैं। पूर्व आपत्तियों के बावजूद परियोजना आगे बढ़ने पर उन्होंने 'चक्का जाम' की धमकी दी है। अधिकारियों का दावा है कि आरक्षण नियमों का पालन किया जा रहा है, अतिक्रमण के आरोपों का खंडन किया गया है।

Web Title : Fugewadi residents protest 'Urban Street' plan, threaten road blockade.

Web Summary : Fugewadi locals oppose the 'Urban Street' project's widened footpath, citing road narrowing and displacement risks. They threaten 'chakka jam' if project proceeds despite earlier objections. Authorities claim adherence to reservation rules, denying encroachment allegations.