प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; अकरा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:44 IST2025-09-01T15:44:24+5:302025-09-01T15:44:38+5:30
प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून अकरा जणांनी एकत्र येऊन तरुणाचा खून केला. ही घटना २२ जुलै २०२५ रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पिंपळे गुरव येथील देवकर पार्क परिसरात घडली.

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; अकरा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून अकरा जणांनी एकत्र येऊन तरुणाचा खून केला. ही घटना २२ जुलै २०२५ रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पिंपळे गुरव येथील देवकर पार्क परिसरात घडली.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगट (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत विनोद खोकर, करण विनोद खोकर, सुरेंद्र हरी सारसर, प्रशांत हरी सारसर, सागर हरी सारसर, अक्षय राजेश सारसर, युवराज सोळंकी, नवीन दशरथ पिवाल, विनोद पापाजी सोळंकी व दोन महिला यांच्यासह एकूण ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी किसन घेंगट (वय ४५, रा. बंडगार्डन, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा रामेश्वर घेंगट याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून संशयितांनी फिर्यादीला चर्चेसाठी बोलावून रामेश्वरला घरात बंद करून लाथाबुक्के, बेल्ट व रस्सीच्या साहाय्याने मारहाण केली. तसेच गळा आवळून त्याला गंभीर दुखापती केल्या. उपचारादरम्यान रामेश्वरचा मृत्यू झाला.