विधानसभेवेळी भोसरीत,आता इंदापूरच्या मतदार यादीत नाव;इच्छुक पती-पत्नीचे नाव गेले दुसरीकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:54 IST2025-12-04T13:52:00+5:302025-12-04T13:54:05+5:30
- इच्छुक पती-पत्नीची नावे भोसरी विधानसभेतून वगळून थेट इंदापूर आणि बारामतीमध्ये गेल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणातूनच त्यांचा पत्ता कट झाला आहे

विधानसभेवेळी भोसरीत,आता इंदापूरच्या मतदार यादीत नाव;इच्छुक पती-पत्नीचे नाव गेले दुसरीकडे
पिंपरी : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघात मतदान केलेले असताना, तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पती-पत्नीचे नाव दुसरीकडे टाकण्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यांची नावे भोसरी विधानसभेतून वगळून थेट इंदापूर आणि बारामतीमध्ये गेल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणातूनच त्यांचा पत्ता कट झाला आहे. यावरून गंभीर आक्षेप नोंदवत जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या आई-वडिलांच्या नावांबाबत हा प्रकार घडला आहे. या संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभाग व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग ८ मधून माझे वडील युनूस शेख आणि प्रभाग क्रमांक ९ मधून माझी आई राबिया शेख इच्छुक आहेत. दोघांपैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार होती. दरम्यान, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना असंख्य घोळ झाले आहेत. आई राबिया यांचे मतदान बारामती विधानसभेतील शिरसुफळ येथे गेले आहे. तर, वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर विधानसभेत टाकले गेले आहे. मागील ३५ वर्षापासून आमचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. आम्ही पत्ता बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही.
दोघांपैकी एकाला मिळणार होती उमेदवारी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग ८ मधून माझे वडील युनूस शेख आणि प्रभाग क्रमांक ९ मधून माझी आई राबिया शेख इच्छुक आहेत. दोघांपैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार होती, असे इम्रान शेख म्हणाले.
आहेत. आई राबिया यांचे मतदान बारामती विधानसभेतील शिरसुफळ येथे गेले आहे.तर,वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर विधानसभेत टाकले गेले आहे. मागील ३५ वर्षापासून आमचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. आम्ही पत्ता बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही.