Pimpari-chinchwad : कर संकलन ‘टार्गेट’ गाठण्यासाठी महापालिकेकडे उरले दहा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:07 IST2026-03-20T12:07:22+5:302026-03-20T12:07:45+5:30

- दोन लाख मालमत्ताधारकांकडे ६२२ कोटींची थकबाकी 

pimpari-chinchwad Municipal Corporation has ten days left to reach tax collection 'target' | Pimpari-chinchwad : कर संकलन ‘टार्गेट’ गाठण्यासाठी महापालिकेकडे उरले दहा दिवस

Pimpari-chinchwad : कर संकलन ‘टार्गेट’ गाठण्यासाठी महापालिकेकडे उरले दहा दिवस

पिंपरी : शहरातील थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी महापालिकेच्या वतीने होर्डिंग्जद्वारे जाहिरात, रिक्षा, सोशल मीडियाद्वारे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. त्यानंतरही २ लाख ३ हजार ७७२ मालमत्ताधारकांनी कर भरण्याकडे कानाडोळा केला आहे. त्यांच्याकडे तब्बल ६२२ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. करसंकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आता फक्त दहा दिवस उरले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नोंदणीकृत मालमत्तांपैकी ५ लाख ६० हजार ४७३ मालमत्ताधारकांनी ८१७ कोटी ४३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. चालू आर्थिक वर्षात विभागाने एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने कर वसुलीसाठी शहरात १८ झोन कार्यरत आहेत. शहरातील एक लाखापेक्षा जास्त रक्कम असलेल्या थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.

आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस बाकी

आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त कर वसुलीचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना मदत होण्यासाठी विभागाने अधिकचे कॅश काऊंटर वाढविले आहेत. त्याची वेळसुद्धा वाढविण्यात आली आहे.

अभय योजनेतून दंडावर सवलत

पुढील दहा दिवस सर्व विभागीय कर संकलन कार्यालये नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत कार्यालयांतील कॅश काऊंटर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५:४५ या वेळेत सुरू राहणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत दिली जात आहे.

८० मालमत्ता जप्त

पाच वर्षांपासून मालमत्ता कर न भरलेल्या मिळकतधारकांवर जप्तीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. पालिकेच्या कर संकलन विभागाने आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्तीनंतरही कर न भरणाऱ्यांच्या मालमत्तांचा आगामी आर्थिक वर्षांत लिलाव करण्याचे नियोजन आहे.  - सचिन पवार, उपायुक्त, महापालिका.

Web Title : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका: कर लक्ष्य को पूरा करने के लिए दस दिन शेष

Web Summary : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ने 2.03 लाख संपत्ति मालिकों से बकाया ₹622.42 करोड़ कर का भुगतान करने का आग्रह किया है, अब केवल दस दिन शेष हैं। निगम देर से भुगतान पर 90% की छूट दे रहा है और चूककर्ताओं की 80 से अधिक संपत्तियां जब्त की हैं। ₹1000 करोड़ का लक्ष्य पूरा करने के प्रयास तेज।

Web Title : Pimpri-Chinchwad Municipal Corporation: Ten Days Left to Meet Tax Target

Web Summary : Pimpri-Chinchwad Municipal Corporation urges 2.03 lakh property owners to pay ₹622.42 crore in outstanding taxes with only ten days remaining. The corporation is offering a 90% discount on late payment penalties and has seized over 80 properties from defaulters. Efforts intensify to meet the ₹1000 crore target.