LPG Gas Crisis : हॉटेल्सना पाइपने गॅस देणार; जोडण्यांसाठी परवानग्या द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:22 IST2026-03-17T15:21:02+5:302026-03-17T15:22:23+5:30

- महापालिका आयुक्तांच्या सूचना : एमएनजीएल अधिकारी, हाॅटेल व्यावसायिकांची महापौरांसोबत बैठक

pimpari-chinchwad LPG Gas Crisis Gas will be supplied to hotels through pipes; permits will be given for connections. | LPG Gas Crisis : हॉटेल्सना पाइपने गॅस देणार; जोडण्यांसाठी परवानग्या द्या

LPG Gas Crisis : हॉटेल्सना पाइपने गॅस देणार; जोडण्यांसाठी परवानग्या द्या

पिंपरी : शहरातील नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सुलभ नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध व्हावी तसेच नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांना गॅस जोडणी मिळण्यासाठी आवश्यक परवानग्या तातडीने देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित विविध कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) अधिकारी, महापौर रवी लांडगे आणि हाॅटेल असोसिएशनचे पदाधिकारी यांची महापालिका भवनात सोमवारी (दि. १६) बैठक झाली. यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यावसायिक संचालक शंकर करजगी, भाग्यश्री मंथलकर, पिंपरी-चिंचवड हाॅटेल अँड रेस्टाॅरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे, सचिव तेजस जुनवणे आदी उपस्थित होते.

शहरात एमएनजीएलमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी महापालिकेकडून आवश्यक असलेल्या परवानग्या लवकरात लवकर कशा देता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. घरगुती वापरासोबतच हॉटेल्स व खाणावळींना नैसर्गिक गॅस उपलब्ध झाल्यास इंधनाचा खर्च कमी होण्याबरोबरच पर्यावरणपूरक व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीनंतर एमएनजीएलच्या शिष्टमंडळासह महापौर लांडगे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना परवानगी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

चार हजार हॉटेल्स-नागरिकांना पाइपने गॅस 

महापालिकेकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यास गॅस पाइपलाइनलगत असलेली हाॅटेल्स व नागरिक अशा एकूण चार हजार जणांना टप्प्याटप्प्याने कनेक्शन देणे शक्य होणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती हाॅटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे यांनी दिली.

Web Title : एलपीजी संकट: होटलों को पाइप से गैस, अनुमतियाँ जारी

Web Summary : पिंपरी-चिंचवड में होटलों और निवासियों के लिए पाइप से प्राकृतिक गैस की अनुमति में तेजी। पर्यावरण के अनुकूल, लागत प्रभावी ईंधन का लक्ष्य, नगरपालिका एमएनजीएल के साथ मिलकर 4,000 उपयोगकर्ताओं को चरणों में जोड़ेगी, एलपीजी संकट का समाधान करेगी और स्थायी ऊर्जा समाधानों को बढ़ावा देगी।

Web Title : Piped Gas for Hotels: Permissions Granted Amidst LPG Crisis

Web Summary : Pimpri-Chinchwad officials expedite permissions for piped natural gas to hotels and residents. Aiming for eco-friendly, cost-effective fuel, the municipality collaborates with MNGL to connect 4,000 users in phases, addressing the current LPG crisis and promoting sustainable energy solutions.