शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : गॅसटंचाईची हिंजवडी आयटी पार्कला झळ; घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:00 IST

- कंपन्यांच्या कॅन्टीनमधील मेनूतील खाद्यपदार्थांमध्ये घट : कर्मचाऱ्यांच्या ‘पीजी’तील मेससेवाही विस्कळीत

- गोविंद बर्गे

पिंपरी : शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅसटंचाईचा परिणाम आता हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांवरही जाणवू लागला आहे. कंपन्यांमधील कॅन्टीन सेवा आणि हाॅटेलमधील खाद्यपदार्थ पुरवठा विस्कळीत झाल्याने कर्मचाऱ्यांना घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कामाच्या धावपळीत असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये कॅन्टीन किंवा कंत्राटदारांमार्फत चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाते. तेथे चायनीज, पंजाबी आणि दाक्षिणात्य पदार्थांसह विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. मात्र, सध्या एलपीजी गॅसचा पुरवठा बंद असल्याने कॅन्टीन चालविणाऱ्या कंत्राटदारांना अडचणी येत आहेत. परिणामी तेथील खाद्यपदार्थांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे.पूर्वी नाश्ता किंवा जेवणासाठी आठ ते दहा प्रकारचे पदार्थ उपलब्ध असत. मात्र, सध्या दोन ते तीन पदार्थच मिळत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. काही कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाने कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात घरून जेवणाचा डबा आणण्याचा सल्ला दिला आहे.

‘पीजी’मधील मेस सेवा विस्कळितआयटीनगरीत नोकरीसाठी येणाऱ्या अनेक तरुण-तरुणींसाठी पेईंग गेस्ट (पीजी) ही राहण्याची व्यवस्था आहे. घरापासून दूर राहणाऱ्या मुली आणि मुलांसाठी ‘पीजी’मधील मेस हेच मुख्य साधन असते. मात्र, अनेक मेसमध्ये रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

माझ्या काही मैत्रिणी ‘पीजी’मध्ये राहतात. तेथेही अशीच परिस्थिती आहे. रोज बाहेरून खाद्यपदार्थ मागवावे लागत आहेत. मात्र, ते सर्वांसाठी परवडणारे नाही. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रशासनाने व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा. - ऋतुजा कदम, आयटी कर्मचारी. 

घरूनच जेवणाचा डबा आणण्याबाबत दोन दिवसांपूर्वी मनुष्यबळ विभागाचा ई-मेल आला. कंपनीच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची संख्याही कमी झाल्याचे त्यात म्हटले आहे. आता घरूनच जेवणाचा डबा घेऊन जात आहोत.- अजिंक्य केवळे, आयटी कर्मचारी.

आमची कंपनी चहा, नाश्ता, जेवणाची सुविधा देते. मात्र, सध्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची संख्या कमी झाली आहे. घरूनच जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना शुक्रवारी ई-मेलद्वारे कंपनीकडून देण्यात आल्या आहेत.- निमेश गुप्ता, आयटी कर्मचारी.

हिंजवडी येथे ‘पीजी’मध्ये राहतो. गॅसटंचाईमुळे जेवणातील पदार्थ कमी केले जातील, असे सांगितले आहे. मात्र, अद्याप जेवण सुरळीत सुरू आहे. कंपनीतही पूर्वीसारखेच नाश्ता व जेवण मिळत आहे. सध्या तीन दिवस वर्क फ्राॅम होम करावे लागत आहे.- आकाश मेनसे, आयटी कर्मचारी.

English
हिंदी सारांश
Web Title : Hinjewadi IT Park hit by gas shortage; employees told to bring lunch.

Web Summary : Hinjewadi IT Park faces disruption due to LPG gas shortage, impacting canteen services. Employees are advised to bring lunch as food options decrease. PG messes also affected.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाई