Pimpari-chinchwad : सेवानिवृत्त शहर अभियंत्यांच्या कामाची चौकशी? वादग्रस्त कारभारावर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:54 IST2026-03-28T14:53:42+5:302026-03-28T14:54:38+5:30

- मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त कारभारावर सवाल : कनिष्ठ अभियंता आणि बनावट कागदपत्र प्रकरण

pimpari-chinchwad Inquiry into the work of retired city engineers Questions on controversial administration | Pimpari-chinchwad : सेवानिवृत्त शहर अभियंत्यांच्या कामाची चौकशी? वादग्रस्त कारभारावर सवाल

Pimpari-chinchwad : सेवानिवृत्त शहर अभियंत्यांच्या कामाची चौकशी? वादग्रस्त कारभारावर सवाल

पिंपरी : महापालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णयांवर शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी राज्याच्या विधानभवनात प्रश्न उपस्थित केले आहेत. नगरसेवकांनी वारंवार चौकशीची मागणी करूनही त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केला.

अहिर म्हणाले की, जानेवारी महिन्यात निकम यांनी निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक वादग्रस्त निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. कनिष्ठ अभियंता आणि बनावट शासकीय कागदपत्रांच्या आधारे कामे केली. एका कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणात बोगस कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, सध्या त्या कनिष्ठ अभियंत्याची नांदेड-वडाळा येथे बदली झाली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून निकम यांच्यावर कठोर कारवाई करावी.

राजेंद्र जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

निकम यांच्या चौकशीसाठी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक अनावश्यक आणि खर्चिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गेल्या नऊ वर्षांत सुमारे ४० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात आली. त्यातील अनेक कामे दर्जाहीन असून, काही प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत.

ठेकेदार, अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी संगनमत करून कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. ग्रीन बॉण्ड आणि म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून शेकडो कोटी उभारण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला असून, बँकेतील कोट्यवधींच्या ठेवी मोडण्यात आल्या. सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांचे दायित्व निर्माण करण्यात आले आहे, असे त्या पत्रात नमूद आहे.

Web Title : पिंपरी-चिंचवड: सेवानिवृत्त शहर अभियंता के काम की जांच? विवादास्पद शासन पर सवाल

Web Summary : शिवसेना विधायक सचिन अहिर ने सेवानिवृत्त शहर अभियंता मकरंद निकम पर भ्रष्टाचार का आरोप लगाया। आरोपों में घटिया काम, गैर-मौजूद परियोजनाएं और वित्तीय कुप्रबंधन शामिल हैं। पूर्व पार्षद जगताप ने भी निकम पर महंगे परियोजनाओं को मंजूरी देने और नगरपालिका के लिए वित्तीय देनदारियां बनाने का आरोप लगाया।

Web Title : Pimpri-Chinchwad: Inquiry into retired city engineer's work? Questions over controversial governance.

Web Summary : Shiv Sena MLA Sachin Ahir questioned alleged corruption by retired city engineer Makrand Nikam. Allegations include substandard work, nonexistent projects, and financial mismanagement. Former corporator Jagtap also accused Nikam of approving costly projects and creating financial liabilities for the municipality.