शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडमध्ये अपघातात चिंचवडच्या अभियंता तरुणीचा मृत्यू; सात दिवसांनी मूळ गावी अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:37 IST

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठवड्याचा कालावधी  

पिंपरी : बँकॉकमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या चिंचवडच्या केशवनगर येथील पूजा प्रशांत मुळे (वय २६) हिचा गुरुवारी (दि. ५) अपघाती मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मुळे कुटुंबाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, मुलीचा चेहरा पाहण्यासाठी सात दिवसांची वाट पाहावी लागली. पूजावर सात दिवसांनी गुरुवारी (दि. १२) बीड या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूजाचे वडील प्रशांत मुळे कुटुंबासह चिंचवडच्या केशवनगर येथील मोरया गोसावी राजपार्क येथे वास्तव्यास आहेत. पूजाने मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. ती पुण्यातील खराडी येथील कंपनीमध्ये संगणक अभियंता होती. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दि. १ मार्चला थायलंड येथील कोसामुइ बेटावर गेली होती. त्या वेळी परिसरात फिरण्यासाठी दुचाकी भाड्याने घेतली होती. दि. ५ मार्चच्या सकाळी दुचाकीवरून जात दुभाजकाला धडकून ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर पूजाला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, तिच्या रक्तगटाचे रक्त वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे तीन तासांतच तिचा मृत्यू झाला.

प्रशांत मुळे म्हणाले की, पूजाच्या अपघाताची माहिती मिळाल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर तेथील नातेवाईकांना अपघाताच्या ठिकाणी पाठविले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. परदेशात मृत्यू झाल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान होते. तेथील दूतावासाशी संपर्क केला. मात्र, तेथील प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब लागला. विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांनाही अपघाताची माहिती दिली. त्यांनी तिचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला. शुक्रवारी (दि. १२) सकाळी पूजाचा मृतदेह भारतात आणण्यात आला. आमच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chinchwad Engineer Dies in Thailand Accident; Funeral Held After Week

Web Summary : Pooja Mule, 26, from Chinchwad, died in a Thailand accident. Legal hurdles delayed the return of her body. After seven days, final rites were performed in Beed. She was a software engineer who went to Thailand for vacation.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र