पिंपरी : भाजपच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाच्या थकीत मिळकतकर प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सत्ताधाऱ्यांना जाग आली आणि मंगळवारी (दि.३१) तातडीने महापालिकेकडे थकबाकीचा भरणा करण्यात आला.
महापालिकेच्या कर संकलन प्रक्रियेतील त्रुटींमुळे संबंधित कार्यालयाचा कर वेळेत भरला गेला नव्हता, ही बाब नुकतीच समोर आली होती. मात्र, प्रशासनाकडून सूचना मिळताच ३१ मार्चच्या अंतिम मुदतीत संपूर्ण थकबाकी भरल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले.कर पावती दिलीच नाही...
महापालिकेकडून मिळकतकर वसुलीसाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून पावत्या वितरित केल्या जातात. याच प्रक्रियेत संबंधित कार्यालयाला कर पावती वेळेत मिळाली नसल्याने भरण्यात विलंब झाल्याचे काटे यांनी सांगितले. प्रशासनाने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई करत कर भरला गेला, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, गेल्या तीन वर्षांत सर्वांकडून कर वसूल करणाऱ्या महापालिकेकडून भाजपच्या कार्यालयाला पावती द्यायची कशी राहून गेली, असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.
Web Summary : Following a Lokmat report, the BJP office in Pimpri-Chinchwad promptly paid its overdue property tax. City President Shatrughna Kate cited technical issues and delayed receipt of the tax bill as reasons for the delay, emphasizing immediate action upon notification.
Web Summary : लोकमत की रिपोर्ट के बाद, पिंपरी-चिंचवड में बीजेपी कार्यालय ने तुरंत अपना बकाया संपत्ति कर चुकाया। शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे ने तकनीकी मुद्दों और कर बिल की प्राप्ति में देरी को देरी का कारण बताया, और अधिसूचना पर तत्काल कार्रवाई पर जोर दिया।