Crime News : गावी गेलेल्या घरांवर पाळत; दरवाजाबाहेरची चावी पाहत महिलेकडून चोरी

By नारायण बडगुजर | Updated: March 10, 2026 17:31 IST2026-03-10T17:31:01+5:302026-03-10T17:31:23+5:30

- गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने महिलेला ठोकल्या बेड्या

pimpari-chinchwad Crime Surveillance on houses in the village; theft from a woman while looking at the key outside the door | Crime News : गावी गेलेल्या घरांवर पाळत; दरवाजाबाहेरची चावी पाहत महिलेकडून चोरी

Crime News : गावी गेलेल्या घरांवर पाळत; दरवाजाबाहेरची चावी पाहत महिलेकडून चोरी

पिंपरी : गावी जाताना दरवाजाला कुलूप लावून बाहेर चावी ठेवणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून एका महिलेने सांगवी येथे दोन घरफोड्या केल्या. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सांगवी ते वारजे माळवाडीपर्यंत २५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत संशयित महिलेची ओळख पटवली. त्यानंतर तिला अटक करत तिच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले.

सुमन दत्ता लोंढे (वय ३५, रा. अचानक चौक, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एकने केला. पथकाने सांगवी ते वारजे माळवाडी दरम्यान सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक महिला चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी महिलेची माहिती घेत तिला अटक केली. पोलिस कोठडीदरम्यान तिच्याकडे तपास करत तिच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. महिलेने मागील वर्षी सांगवी येथे आणखी एक घरफोडी केल्याचे सांगितले.

नागरिक घरातून बाहेर जाताना घराला कुलूप लावतात, मात्र चावी दरवाजाच्या बाहेर कुठेतरी लपवून ठेवतात. चावी लपवून ठेवणाऱ्या नागरिकांवर संशयित महिला पाळत ठेवत असे. त्यानंतर संधी साधून तिने या चोऱ्या केल्या होत्या. महिलेला सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहायक उपनिरीक्षक संतोष इंगळे, पोलिस अंमलदार उषा दळे, महादेव जावळे, शिवराम भोपे, अजय डगळे, जयवंत राऊत, देवा राऊत, विजय शेळकंदे, तेजस भालचिम, संदेश देशमुख, विजय जानराव यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title : छुपी चाबियों वाले घरों को निशाना बनाने वाली महिला गिरफ्तार।

Web Summary : सांगवी में एक महिला को उन लोगों के घरों में चोरी करने के आरोप में गिरफ्तार किया गया है जो अपनी चाबियाँ बाहर छिपाते थे। पुलिस ने उसकी पहचान करने के लिए 250 सीसीटीवी फुटेज की समीक्षा की। ₹8 लाख के चोरी के गहने बरामद किए गए। उसने उन घरों को निशाना बनाया जिनके मालिक बाहर थे।

Web Title : Woman arrested for theft, targeting homes with hidden keys.

Web Summary : A woman was arrested in Sangvi for burglarizing homes of people who hid their keys outside. Police reviewed 250 CCTV footages to identify her. Stolen jewelry worth ₹8 lakh was recovered. She targeted houses whose owners were away.