शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसासह ट्रॅफिक वॉर्डनला लाच घेताना अटक;रिक्षा चालकाकडे मागितली होती ४०० रुपयांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 18:29 IST

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संशयितांनी ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

पिंपरी : पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी रिक्षाचालकाकडून ४०० रुपयांच्‍या लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अंमलदार वर्षा विठ्ठल कांबळे (वय ३५) व ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (वय २८) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तक्रारदार हा रिक्षाचालक असून तो पिंपरी, मोरवाडी, केएसबी चौक परिसरात प्रवासी वाहतूक करतो. दि. १७ नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी वाहतूक केल्याच्या कारणावरून महिला पोलिस अंमलदार वर्षा कांबळे व ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदार रिक्षा चालकाकडून ३०० रुपये घेतले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा रिक्षा अडवून दरमहा ‘हफ्ता’ म्हणून ५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संशयितांनी ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शनिवारी केएसबी चौकात सापळा रचण्यात आला. यावेळी ट्रॅफिक वॉर्डन गव्हाणे यांनी तक्रारदाराकडून ४०० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस शिपाई कांबळे हिलाही ताब्यात घेण्यात आले. नागरिकांनी लाच मागणी झाल्यास तातडीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman Police, Traffic Warden Arrested for Accepting Bribe from Rickshaw Driver

Web Summary : A female police officer and traffic warden in Pimpri were arrested for accepting a ₹400 bribe from a rickshaw driver. They demanded money for allowing excess passengers and monthly fees. Anti-Corruption Bureau caught them red-handed.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी