पिंपरी : हवाई दलातील अधिकारी सुट्टीच्या दिवशी बॉर्डर २ सिनेमा पाहण्यासाठी गेला असता अज्ञात चोरट्याने अधिकाऱ्याचे घर फोडून घरातून चार लाख ४० हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. २५ जानेवारी) रात्री अकरा वाजताच्या सुमारास दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये उघडकीस आली.
मुकेशकुमार सुधेश्वर सिंग (४३, सीएमई, दापोडी) यांनी याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेशकुमार सिंग हे भारतीय हवाई दलात कार्यरत आहेत. ते दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग या संस्थेच्या आवारात वास्तव्यास आहेत. रविवारी त्यांना सुट्टी असल्याने ते सायंकाळी सहा वाजता बॉर्डर २ हा सिनेमा पाहण्यासाठी गेले.
दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. ते रात्री अकरा वाजताच्या सुमारास घरी आले. या कालावधीत अज्ञात चोरट्याने सिंग यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरामधून सोन्याचा हार, अंगठी, चैन, मंगळसूत्र, ब्रेसलेट आणि इतर दागिने असा चार लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सिंग हे सिनेमा पाहून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
Web Summary : An Air Force officer's home in Dapodi was burgled while he watched 'Border 2'. Thieves stole jewelry worth ₹4.4 lakhs. Police have registered a case and are investigating the incident that occurred on Sunday night.
Web Summary : दपोडी में वायुसेना अधिकारी 'बॉर्डर 2' देखने गए, तभी उनके घर में चोरी हो गई। चोर 4.4 लाख रुपये के गहने चुरा ले गए। पुलिस ने मामला दर्ज कर रविवार रात हुई घटना की जांच शुरू कर दी है।