Pimpari-chinchwad :स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:47 IST2026-03-27T14:47:35+5:302026-03-27T14:47:47+5:30

- पिंपरी येथील सम्राट चौकातील दुकानावर कारवाई 

pimpari-chinchwad crime news Police take action against prostitution going on in spa center | Pimpari-chinchwad :स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई

Pimpari-chinchwad :स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत तीन महिलांची सुटका केली. ही कारवाई बुधवारी (२५ मार्च) पिंपरी येथील सम्राट चौकातील रिच फील स्पा येथे करण्यात आली. स्पा चालक मयूर मोहिते (वय २६, रा. दिघी), स्पा मॅनेजर अक्षय महादेव सुतार (२६, रा. निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट चौक पिंपरी येथे असलेल्यारिच फील स्पारिच फील स्पा सेंटरमध्ये संशयितांनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याची माहिती आणि मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करून तीन महिलांची सुटका केली. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मागील तीन महिन्यांमध्ये मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आठ कारवाया केल्या असून, त्यामध्ये २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये १७ पीडित महिलांची सुटका केली आहे. मागील तीन वर्षांमध्ये अवैधरीत्या वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या २९ अस्थापना बंद केल्या आहेत.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, अपर आयुक्त बसवराज तेली, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते, सहायक निरीक्षक वैशाली शेंडगे, सहायक उपनिरीक्षक सुनील शिरसाट, पोलिस अंमलदार भगवंता मुठे, गणेश कारोटे, श्रद्धा भरगुडे, वैष्णवी गावडे, नीलम बुचडे, संगीता जाधव, उदयकुमार भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : पिंपरी-चिंचवड: स्पा सेंटर पर पुलिस का छापा, वेश्यावृत्ति का भंडाफोड़, महिलाओं को बचाया

Web Summary : पिंपरी-चिंचवड पुलिस ने एक स्पा सेंटर पर छापा मारकर वेश्यावृत्ति का भंडाफोड़ किया और तीन महिलाओं को बचाया। रिच फील स्पा पर छापा, दो गिरफ्तार। मानव तस्करी विरोधी प्रकोष्ठ ने आठ छापे मारे, सत्रह महिलाओं को बचाया और तीन वर्षों में 29 प्रतिष्ठानों को बंद कर दिया।

Web Title : Pimpri-Chinchwad: Police Raid Spa, Bust Prostitution Ring, Rescue Women

Web Summary : Pimpri-Chinchwad police busted a prostitution ring at a spa, rescuing three women. The raid occurred at Rich Feel Spa, with two arrested. Anti-Human Trafficking Cell reports eight raids, rescuing seventeen women recently and closing 29 establishments in three years.