शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : लोणावळ्यात व्हिलामधून सायबर टोळीचा पर्दाफाश; कोटींची उलाढाल उघड

By नारायण बडगुजर | Updated: March 18, 2026 12:45 IST

या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पिंपरी : लोणावळा परिसरातील व्हिला व गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करून विविध बँक खात्यांद्वारे सायबर फसवणुकीची रक्कम फिरवणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मोनिल अतुलकुमार मोदी (वय २४, रा. मेहसाणा, गुजरात), रवी गोकल प्रसाद जाट (वय २१, रा. राजगड, मध्य प्रदेश), रुद्रपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान (वय २२, रा. खंडवा, मध्य प्रदेश), हंश कैलास वर्मा (वय १९, रा. बोरीवली, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी लोणावळ्यातील व्हिलामध्ये लपून राहून विविध बँकांच्या करंट अकाउंटचा वापर करून सायबर फसवणुकीची रक्कम जमा व वर्ग केली. लोणावळ्यातील ४०० ते ५०० व्हिलामध्ये शोध घेऊन संशयितांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांकडून लॅपटॉप, सात मोबाइल, १४ डेबिट कार्ड, वेब कॅमेरे आणि बँक किट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांकडून एका खात्यात एक कोटींपेक्षा जास्त रक्कम फिरवल्याचे उघड झाले आहे.

संशयितांनी देशातील विविध बँकांमध्ये खाती उघडून त्यांचा गैरवापर केल्याची कबुली दिली आहे, तसेच परदेशातून वेब कॅमेऱ्याद्वारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलिस अंमलदार दीपक भोसले, हेमंत खरात, विनायक म्हसकर, सुभाष पाटील, किरण देवकर, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, प्रवीण शेळंकदे, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, नितेश बिचेवार, दीपाली चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lonavala: Cyber Fraud Ring Busted, Crores Transacted Through Villa

Web Summary : Police busted a cyber fraud gang operating from a Lonavala villa. Four arrested, large amounts of cash seized. Crores of rupees transacted via bank accounts. Investigation ongoing.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या