चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून; वडगाव मावळ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:06 IST2025-05-24T14:02:39+5:302025-05-24T14:06:30+5:30
पतीने पत्नीवर संशय घेऊन तिच्या डोक्यात तसेच कपाळावर दगडाने मारहाण करून तिला ठार मारले.

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून; वडगाव मावळ येथील घटना
वडगाव मावळ : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आंदर मावळातील कोंडिवडे या गावात शुक्रवारी घडली. याबाबत महिलेच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपी अशोक बारकू वाघमारे (रा. कातकरी वस्ती, कोंडिवडे ता. मावळ) याला वडगाव पोलिसांनी अटक केली. सोनाबाई वाघमारे (३३, रा. कोंडिवडे, ता. मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.
वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेवर संशय घेऊन शिवीगाळ करत मारहाण करीत असे, आरोपी पती व आपल्या पत्नीसह शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मौजे कोंडिवडे येथे मासेमारी करण्यासाठी जात होते. तेथे आरोपी पतीने पत्नीवर संशय घेऊन तिच्या डोक्यात तसेच कपाळावर दगडाने मारहाण करून तिला ठार मारले. सहायक पोलिस निरीक्षक शीतल कुमार डोईजड हे पुढील तपास करीत आहेत.