Pimpari-chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद पाइपलाइन प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:08 IST2026-04-03T15:07:27+5:302026-04-03T15:08:15+5:30

- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या अशा पवना थेट बंद पाइपलाइन योजनेसाठीचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले

pimpari-chinchwad chief Minister meeting to accelerate the Pawana Bandh pipeline project for Pimpri-Chinchwad city | Pimpari-chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद पाइपलाइन प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट

Pimpari-chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद पाइपलाइन प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पवना धरणातून बंद पाइपलाइन प्रकल्पाचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून, उर्वरित प्रकल्पपूर्तीसाठी निधी देऊन तातडीने गती देण्यासाठी भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या अशा पवना थेट बंद पाइपलाइन योजनेसाठीचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात १८६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, एकूण रकमेच्या २५ टक्के तरतूद नसेल तर पुन्हा निविदा निघायला अडचण येऊन प्रकल्प प्रलंबित होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नगरसेवक राहुल कलाटे यांनी मांडली. 

पवना धरणातून रोज सुमारे पाचशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. नैसर्गिक प्रवाहाद्वारे रावेत बंधाऱ्यापर्यंत येणारे हे पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या पद्धतीमुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत असून प्रदूषित पाणी मिक्स होऊन पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतोय. पवना थेट बंद पाइपलाइन प्रकल्पामुळे अंदाजे १०० एमएलडी पाण्याची बचत होऊन तेवढे अतिरिक्त पाणी पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. 

शिवाय सुमारे १५ वर्षे प्रकल्प प्रलंबित राहिल्याने प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन ३०० कोटींहून १२५६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची स्थिती आहे. ‘टँकर लॉबी’विरोधात नागरिकांमधूनही नाराजीचा सूर वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी यात प्राधान्याने लक्ष घालून निधीची तरतूद तातडीने करावी, अशी मागणी केली.

Web Title : पिंपरी-चिंचवड की पवना बंद पाइपलाइन परियोजना में तेजी लाने हेतु मुख्यमंत्री से आग्रह।

Web Summary : भाजपा पार्षद राहुल कलाटे ने मुख्यमंत्री फडणवीस से मुलाकात कर पिंपरी-चिंचवड की पानी की कमी के लिए पवना बंद पाइपलाइन परियोजना में तेजी लाने हेतु धन की मांग की। परियोजना पूर्ण होना पानी बचाने और बढ़ती लागत को संबोधित करने के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : CM urged to expedite Pimpri-Chinchwad's Pavana closed pipeline project.

Web Summary : BJP corporator Rahul Kalate met CM Fadnavis, pushing for funds to accelerate the Pavana closed pipeline project for Pimpri-Chinchwad's water scarcity. Project completion is crucial to save water and address rising costs.