वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू; वाहनचालक फरार
By नारायण बडगुजर | Updated: March 3, 2024 17:54 IST2024-03-03T17:52:58+5:302024-03-03T17:54:19+5:30
अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळून गेला

वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू; वाहनचालक फरार
पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. रावेत येथे औंध रावेत बीआरटी मार्गावर २८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
आशुतोष शंकर लोकरे (२७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तुषार शशिकांत भिंगावडे (३४, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार यांचा मेहुणा आशुतोष लोकरे हे २८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रावेत येथील मुकाई चौक येथे रस्त्याने पायी चालत होते. त्यावेळी भरधाव वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने आशुतोष यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळून गेला.