दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 19:43 IST2019-11-10T19:42:43+5:302019-11-10T19:43:25+5:30
दुचाकीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना भाेसरी येथे घडली.

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वेगातील अज्ञात दुचाकीने धडक दिल्यामुळे पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना भोसरीतील बीआरटी बसथांब्याजवळ घडली. बाळू ऊर्फ बाळासाहेब लांडगे (वय ५६, रा. गुळवे वस्ती, भोसरी) असे अपघातातमृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सागर बाळासाहेब लांडगे (वय २९), यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास बाळासाहेब लांडगे हे भोसरीतून पायी चालले होते. ते बीआरटी बस थांब्याजवळ आले असता अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.