अजगराची शेपटी धरून गिळलेली बकरी काढली बाहेर; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 09:02 IST2025-06-10T08:59:29+5:302025-06-10T09:02:09+5:30

- मळवंडी ठुले येथे अजगराच्या पोटातून संपूर्ण बकरी मृतावस्थेत बाहेर आली. त्यानंतर त्याला पकडून जंगलात नेऊन सोडले.

Pawananagar: In Maval taluka of Pune district Goat caught in python's tail pulled out; Video goes viral | अजगराची शेपटी धरून गिळलेली बकरी काढली बाहेर; व्हिडिओ व्हायरल

अजगराची शेपटी धरून गिळलेली बकरी काढली बाहेर; व्हिडिओ व्हायरल

पवनानगर : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले गावाच्या डोंगरमाथ्यावर अजगराने पूर्ण बकरीच गिळंकृत केली. मात्र, सर्पमित्रांनी अजगराची शेपटी धरताच त्याने गिळलेली बकरी बाहेर काढण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या पोटातून संपूर्ण बकरी मृतावस्थेत बाहेर आली. त्यानंतर जंगलात सोडून देण्यात आले.

मळवंडी ठुले येथील शेतकरी बाळू कोकरे बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गावाच्या शिवारात गेले होते. या परिसरात झाडाझुडपांची संख्या मोठी असल्याने अजगरासारखे प्राणी आहेत.

 

काही अंतरावरील डोंगरमाथ्यावर गेले असता त्यांच्या बकरीवर जंगलातील भल्यामोठ्या अजगराने झडप घातली. त्याच्या झडपेत बकरी सापडली. त्याने तिला गिळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीत बकरी सापडल्याचे बाळू कोकरे यांच्या निदर्शनास आले. कोकरे यांनी वनविभागाला व सर्पमित्रांना ही माहिती दिली. सर्पमित्र व वनविभागाचे कर्मचारी घटनेच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत अकरा फुटाच्या अजगराने संपूर्ण बकरीच गिळंकृत केली होती.

Web Title: Pawananagar: In Maval taluka of Pune district Goat caught in python's tail pulled out; Video goes viral