शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीचे पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल ,अजित पवार यांची उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 14:28 IST

वाल्हेकरवाडी येथून रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे पार्थ पवार यांनी मंगळवारी (दि. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.

पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे पार्थ पवार यांनी मंगळवारी (दि. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला. वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली. पार्थ यांचे वडील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाऊ जय पवार आदी रॅलीत सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ यांनी पिंपरीतील एच एस कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मोरवाडी येथे अहल्यादेवी होळकर, निगडीत अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. चिंचवड येथे क्रांतिकारक चापेकर बंधू यांच्या स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे अंकुश काकडे आदी रॅलीत सहभागी झाले होते. 

मावळ लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादीचे पार्थ पवार समोरासमोर आले असता एकमेकांना शभेच्छा दिल्या..

महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांची अर्ज दाखल करण्यावेळी अनुपस्थिती पार्थ पवार यांचा उमेदवारी दाखल करण्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सह काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते मंडळी, स्टार प्रचारक या सर्वांनीच मात्र पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक