शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पिंपरीत आईवडिलांना मुले झाली नकोशी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 8:36 PM

केंद्र सरकार बेटी बचाव आणि बेटी पढाव उपक्रम राबवित असतानाच आकुर्डीतील एका पोटची मुले नकोशी झाली आहे. पालकांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांवर समृद्धी आणि शौर्य या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. याप्रकरणी राजेश आणि प्रतिभा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी : केंद्र सरकार बेटी बचाव आणि बेटी पढाव उपक्रम राबवित असतानाच आकुर्डीतील एका पोटची मुले नकोशी झाली आहे. पालकांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांवर समृद्धी आणि शौर्य या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. याप्रकरणी राजेश आणि प्रतिभा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डीतील पंचतारानगरातील स्वप्नपूर्ती बिल्डिंग येथे भोसले दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना दहा वर्षांची मुलगी समृद्धी, अडीच वर्षांचा मुलगा शौर्य अशी दोन अपत्ये आहेत. मागील काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये भांडण सुरु होते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. भांडण वाढल्याने मुलांचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला. या दाम्पत्यांमधील वाद विकोपाला गेल्याने वाद काही दिवसांपूर्वी निगडी पोलीस ठाण्यात पोहोचला. सुरूवातीला दाम्पत्याने मुलाचा सांभाळ करण्यास होकार दिला. पण, मुलीला घरी नेण्यास दोघांनीही नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते दाम्पत्य बुधवारी दोन्ही मुलांना घेऊन घरी गेले. मात्र, दुस-याच दिवशी गुरूवारी त्यानी दोन्ही मुलांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणून सोडले. मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैसे द्यावेत, असे आईचे म्हणने आहेत. परिणामी आई- वडिलांच्या वादात दोन्ही मुलांचे हाल झाले आहेत. सध्या दोन्ही मुलं पोलिसांकडेच असून निगडी पोलीसच त्यांचा सांभाळ करीत आहे. अशोक खंडागळे यांनी गुरूवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले आहेत.

भांडणासाठी मुलांना सोडणे चुकीचे प्रत्येक आई-वडिलांसाठी मुलांचा जन्म हा आनंददायी असते. त्यांच्या संगोपनामध्ये आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करतात.  मन मारून त्यांना सर्व सुख, सोयी आणि सुविधा पुरविल्या जातात. लाडात वाढलेली हीच मुले पुढे होतात, सर्वच नाही पण काही मुले आई-वडिलांचे उपकार विसरतात आणि त्यांच्या म्हातारपणी आधार देण्याऐवजी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आई-वडिलांनी पोटच्या मुलांना सोडणे ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच घडली आहे. भांडणासाठी मुलांना सोडणे चुकीचे आहे, अशी पालकांवर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हा