मॅरेज रिक्वेस्ट पाठवून ऑनलाईन फसवणूक; सव्वा लाखांना घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 16:50 IST2021-06-11T16:50:25+5:302021-06-11T16:50:34+5:30
लिंगायत मेट्रोमोनिअल साईटवरून एका अनोळखी व्यक्तीने मॅरेज रिक्वेस्ट पाठवली.

मॅरेज रिक्वेस्ट पाठवून ऑनलाईन फसवणूक; सव्वा लाखांना घातला गंडा
पिंपरी : एका तरुणीची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना ४ ते १७ मे या दरम्यान उमांचल महिला हॉस्टेल आकुर्डी येथे ही घडली आहे. डॉ. देव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), हमजा खोतामिरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत लिंगायत मेट्रोमोनिअल साईटवरून एका अनोळखी व्यक्तीने मॅरेज रिक्वेस्ट पाठवली. फिर्यादी याांच्याशी लग्न करायचे आहे, असे आरोपी डॉ. देव याने सांगितले. त्याने फिर्यादी यांच्यासाठी विदेशातून पार्सल पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी हमजा हिने फियार्दी यांना फोन करून डॉ. देव याने पाठवलेले पार्सल घेण्यासाठी आपण कस्टम विभाग दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवून फियार्दी यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून एक लाख २५ हजार ५०० रुपये घेतले. पैसे घेऊनही फिर्यादी यांना पार्सल मिळाले नाही. त्यामुळे फियार्दी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत तरुणीने गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.
---