फेसबुकवर अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:13 IST2018-09-21T16:12:23+5:302018-09-21T16:13:30+5:30
फेसबुकवर अश्लील फोटो व व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवर अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
ठळक मुद्देमाहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : फेसबुकवर अश्लील फोटो व व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश करम गंगावणे (वय २३, रा. संगम हौ. सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यप्रकरणी तळवडे येथील एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी यांचा चुलत मामाच्या फेसबुक अकाऊंटवर आरोपीने ३१ आॅगस्ट, ७ सप्टेंबरला तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या व्हॉटसअॅपवर ९ सप्टेंबरला फिर्यादीचे अश्लिल फोटो व व्हिडिओ अपलोड केले. यासह फिर्यादीला धमकीही दिली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.