नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून सांगवीत एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:01 IST2019-07-22T16:00:38+5:302019-07-22T16:01:56+5:30

नातेवाईक महिलेशी  प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला.

one merson murdered due to love relationship with relative ladies | नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून सांगवीत एकाचा खून

नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून सांगवीत एकाचा खून

पिंपरी : नातेवाईक महिलेशी  प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी औंध रुग्णालय परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश जीवन खेराले (वय ४०, रा. कामगार वसाहत, औंध ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरकाल जीवन खेराले (वय २८) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विशाल अशोक घोरन (वय ३०), रोहित किशोर घोरन (वय ३०), हितेश ऊर्फ गुड्डू किशोर घोरन (वय २६, सर्व रा. कामगार वसाहत) अशी आरोपींची नावे आहेत.  
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश याचे विशाल सोबत शनिवारी (दि.२०) किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्याचा राग विशालच्या मनात होता. तसेच रोहित याच्या नातेवाईक महिलेशी नीलेशचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याची रोहितला कुणकुण लागली होती. यातूनच रोहितने नीलेशच्या अंगावर एकदा दुचाकी घातली होती. हा सर्व प्रकार विशालला माहीत झाला. त्याने रोहित आणि त्याचा भाऊ हितेश यांच्याशी संगनमत करून नीलेशला मारण्याचा कट रचला. 
  शनिवारी रात्री तिघांनी मिळून नीलेशला औंध रुग्णालय परिसरात आडबाजूला नेले. तिथे नीलेशच्या डोक्यात फरशी घालून त्याला जिवे मारले. यामध्ये नीलेशच्या डोक्याला आणि चेहºयाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: one merson murdered due to love relationship with relative ladies