पिंपरीत चाकुहल्ल्यात एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:05 IST2018-12-18T15:03:06+5:302018-12-18T15:05:07+5:30

जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन आरोपींनी शिवीगळ करीत एकावर चाकुहल्ला केला. त्यात फिर्यादीच्या डोक्याला जखम झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

One injured in knife attack at Pimpri | पिंपरीत चाकुहल्ल्यात एकजण जखमी

पिंपरीत चाकुहल्ल्यात एकजण जखमी

पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन आरोपींनी शिवीगळ करीत एकावर चाकुहल्ला केला. त्यात फिर्यादीच्या डोक्याला जखम झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


               पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटरी चाळ येथे राहणारे सतिश ठोकळ यांनी मारहाण झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. अविनाश काशिनाथ काळे (वय २५, काळेवाडी) आणि कृष्णा काशिनाथ काळे (वय २०, रा. काळेवाडी) या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे सॅनिटरी चाळ येथील घरात झोपले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात चाकू मारून जखमी केले.

Web Title: One injured in knife attack at Pimpri