दोन दुचाकीच्या धडकेत एक ठार : एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 20:33 IST2019-11-28T20:32:56+5:302019-11-28T20:33:30+5:30
दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

दोन दुचाकीच्या धडकेत एक ठार : एक जखमी
पिंपरी : दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला. ही घटना आकुर्डीत ग्रेडसेपरेटरमध्ये मंगळवारी घडली.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक ज्ञानेश्वर उभे (वय २५, रा. चैताली हाऊसींग सोसायटी, अजमेरा कॉलनी, पिंपरी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. राकेश मल्लिकार्जुन गडवी (वय ३९, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दिपकने भरधाव दुचाकी चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दिपकचा मृत्यू झाला. तर, फियार्दी राकेश हे गंभीर जखमी झाले. दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले.