डंपरच्या धडकेत तरुण ठार निगडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:49 IST2019-02-21T15:47:28+5:302019-02-21T15:49:03+5:30
निगडीतील केसबी चौकातील पुलावरून कुदळवाडीच्या दिशेने जात असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या डंपर ने धडक दिली.

डंपरच्या धडकेत तरुण ठार निगडीतील घटना
निगडी: निगडीतील केसबी चौकातील पुलावरून कुदळवाडीच्या दिशेने जात असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या डंपर ने धडक दिली. धडकेत तरुण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्यने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार दि 20 रोजी दुपारी पाचच्या सुमारास घडला. ओंकार मोरे (वय १९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली हाेती. संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. या घटनेचा अधिक तपास भाेसरी एमआयडीचे पाेलीस करीत आहेत.