भोसरीत पिस्तुलासह एकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:05 IST2018-08-04T14:05:22+5:302018-08-04T14:05:39+5:30

पोलिसांनी सापळा लावून विक्रीसाठी पिस्तुल बाळगलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले.

One arrested with Pistul at bhosari | भोसरीत पिस्तुलासह एकास अटक 

भोसरीत पिस्तुलासह एकास अटक 

ठळक मुद्दे२० हजारांचे गावठी पिस्तूल आणि एक काडतुस जप्त

पिंपरी : भोसरी येथील इंद्रायणी नगर येथे विक्रीसाठी पिस्तुल बाळगलेल्या एकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली.विकास मनोज साके (वय २३, रा देहुगाव, ता. मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती इंद्रायणीनगर भोसरी परिसरात पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २० हजारांचे गावठी पिस्तूल आणि एक काडतुस मिळून आले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गवारे करत आहेत.

Web Title: One arrested with Pistul at bhosari