पिस्तुल विक्री करणाऱ्या आरोपीस पिस्तुलसह अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 14:40 IST2018-08-26T14:38:53+5:302018-08-26T14:40:58+5:30
विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाेलिसांनी एकाला अटक केली अाहे.

पिस्तुल विक्री करणाऱ्या आरोपीस पिस्तुलसह अटक
पिंपरी : विक्रीसाठी आणलेल्या चार देशी बनावटीच्या पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे अशा 1लाख 19 हजाराच्या मुद्देमालासह निगडी पोलिसांनी आरोपीला ओटा स्कीम येथून शनिवारी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप नवनाथ सोनवणे (वय 28, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. 25 ऑगस्टला रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्या घराची झडती घेतली असता, 4 पिस्तुल, 8 काडतुसे आढळून आली. विनापरवाना शस्त्र बालगल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत