अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने संबंध, मुलगी गरोदर; आरोपीला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:09 IST2022-07-08T17:08:11+5:302022-07-08T17:09:16+5:30
चिंचवडमधील धक्कादायक प्रकार...

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने संबंध, मुलगी गरोदर; आरोपीला ठोकल्या बेड्या
पिंपरी : एका १५ वर्षीय मुलीशी १ वर्षापासून प्रेम संबंध ठेवले. तसेच मुलीला लग्न करण्याचे अमिष दाखऊन तीच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून पिडीत मुलगी ९ आठवडे ४ दिवसांची गर्भवती राहिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ मध्ये चिंचवड येथे घडली.
पिडीत मुलीच्या आईने गुरूवारी ( दि. ७ ) फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अजय शंकर फडतरे ( वय १९ ) रा. चिंचवडगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिडीत मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही आरोपीने तीच्याशी प्रेमसंबंध ठेवले. लग्न करणार आहे, असे सांगून एप्रिल २०२२ मध्ये फिर्यादी यांच्या राहते घरी येऊन पिडीत मुलीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवेले.