शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘वायसीएम’मधील अधिकाऱ्यांची झाडाझडती

By admin | Updated: August 6, 2015 03:33 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विदारक चित्रण ‘लोकमत’मधील ‘पत्रकारिता परमो धर्म’ यातून मांडण्यात आले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विदारक चित्रण ‘लोकमत’मधील ‘पत्रकारिता परमो धर्म’ यातून मांडण्यात आले. त्याची गंभीर दखल घेऊन उपमहापौर, पक्षनेत्या, स्थायी समिती अध्यक्षांनी रुग्णालयाची भेट घेऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधला. येथील गैरसोई, रुग्णांची होणारी हेळसांड याबाबत झाडाझडती घेतली. तीन दिवसांत तातडीने प्रश्न सुटले पाहिजेत, अशा आशयाचे पत्रही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले.‘लोकमत’च्या वतीने ‘पत्रकारिता परमो धर्म’ हा उपक्रम सुरू केला असून, त्याअंतर्गत चव्हाण रुग्णालयाची ‘लोकमत’च्या टीमने पाहणी करून हॅलो पिंपरी-चिंचवड या पुरवणीत ४ आॅगस्टच्या अंकात तेथील चित्र मांडले होते. वशिल्याने मिळणारा आयसीयू, रुग्णांची हेळसांड, पार्किंगमध्ये होणाऱ्या चोऱ्या, सुरक्षा यंत्रणा कुचकामी, प्रसूतिकक्षाकडे दुर्लक्ष, रुग्णांच्या तुलनेत कमी असलेली लिफ्टची सुविधा, तातडीक सेवेकडे होणारे दुर्लक्ष, अधिकारी डॉक्टर आणि परिचारिकांचे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष यावर लक्ष वेधले होते. परिणामकारक, प्रभावी छायाचित्रांचे पुरावे देऊन वायसीएमचा कारभार किती ढिसाळ आहे, हे शहरवासीयांच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी शहराध्यक्ष, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे यांनी दुपारी साडेचारला वायसीएमला भेट दिली. रुग्ण, डॉक्टर, प्रशासन, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच प्रसूतिविभाग, तातडीक सेवा देणाऱ्या वॉर्डालाही भेट दिली. कर्मचाऱ्यांची कमी असणारी संख्या, डॉक्टरांची कमतरता, रखडलेली कामे याविषयी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रसूति विभागातील सुरक्षेबाबत जागरूक असावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच अतिदक्षता विभागाचे रेकॉर्ड ठेवून प्रसूतीसाठी महिला बाहेर जाऊ नयेत, याची दक्षताही रुग्णालयातील लोकांनी घ्यायला हव्यात; तसेच तिसऱ्या आयसीयू कक्षाचे काम करावे, रुग्णांना चांगली सेवा द्यावी, रुग्णालयाचे नाव बदनाम होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी.(प्रतिनिधी)