तुम्ही आता टेन्शन घेऊ नका... मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 14:50 IST2019-01-08T14:47:39+5:302019-01-08T14:50:29+5:30
कुशाग्र वाकड येथे आपल्या मित्रांसह बॅचलर राहत असे.

तुम्ही आता टेन्शन घेऊ नका... मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
पिंपरी-चिंचवड (वाकड) : मानसिक तणावाच्या गर्तेत अडकलेल्या व्यावसायिक तरुणाने सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि ८) सकाळी अकराच्या सुमारास घडला. कुशाग्र मनोज कंचन (वय ३०, रा. फ्लॅट न एफ १२०३, डायनेस्टी सोसायटी, वाकड, मूळ झांशी) असे त्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकड येथील या सोसायटीत आपल्या मित्रांसह बॅचलर राहत असे. त्याचा इलेक्ट्रॉनिक पार्टस पुरविण्याचा व्यवसाय होता. अलिकडे त्याच्या व्यवसायातील चढ उतारामुळे आणि व्यक्तिगत कारणामुळे तो अलीकडच्या काळात मानसिक तणावाखाली वावरत असे. तर त्याला फिट येण्याचा देखील आजार होता. या सर्वांमुळे आलेल्या नैराश्यातून त्याने राहत असलेल्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. याबाबत कुशाग्रच्या पालकांना कळविण्यात आले आहे.
सुसाईड नोट आढळली
माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. मी तुमच्या गरजा पूर्ण शकलो नाही. तुम्ही आता टेंशन घेऊ नका मला माफ करा आणि माझी ही सुसाईड नोट माझ्या पालकांना दाखfवा असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे