व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा कुख्यात गुंड बाळा वाघेरेसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 09:15 AM2023-03-16T09:15:49+5:302023-03-16T09:18:57+5:30

व्यावसायिकाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

Notorious gangster Bala Waghere arrested for demanding extortion from businessman | व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा कुख्यात गुंड बाळा वाघेरेसह तिघांना अटक

व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा कुख्यात गुंड बाळा वाघेरेसह तिघांना अटक

googlenewsNext

पिंपरी : व्यावसायिकाकडून खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंड बाळा वाघेरेसह जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी बुधवारी (दि.१५) व्यावसायिकाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ही कारवाई करत बाळा वाघेरेसह, राहुल उनेचा, हरिश चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणामध्ये व्यावसायिकाचे अपहरण करत आरोपींनी त्यांना बाळा वाघेरेच्या घरी नेले. तेथे बाळा वाघेरे यांनी व्यावसायिकाकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. तसेच आधीच्या आर्थिक व्यवहारातील पाच लाख रुपये संबंधितांना परत द्यायचे असे सांगितले.

व्यावसायिकाने त्याला नकार दिला असता त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर व्यावसायिकाने खंडणी देण्याचे कबूल करून बाळा वाघेरेच्या घरातून बाहेर पडून थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी थेट बाळा वाघेरेला ताब्यात घेतले.

Web Title: Notorious gangster Bala Waghere arrested for demanding extortion from businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.