शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट पालकांचे बँक खाते तपासणाऱ्या 'त्या ' शाळांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 12:07 PM

महापालिका शिक्षण विभागाने खासगी इंग्रजी शाळांकडे मागितला खुलासा

ठळक मुद्देशहरातील ४० खासगी इंग्रजी शाळांविरोधात तक्रारी

पिंपरी : खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्याची तपासणी केली. अशा तक्रारी पालकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. संबधित शाळांना नोटीस पाठवून या प्रकाराचा खुलासा मागितला आहे.या बरोबरच ज्या शाळा विद्यार्थ्यांकडे शुल्कासाठी तगादा लावत आहेत. शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुपमधून ब्लॉक करत आहेत, अशा शाळांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

शहरातील ४० खासगी इंग्रजी शाळांविरोधात शुल्क वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. त्यातील २५ शाळांना महापालिकेच्या शिक्षण विभागाने ५३ नोटिसा पाठविल्या आहेत. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही खासगी इंग्रजी शाळांनी पालकांकडे शाळेच्या शुल्कासाठी तगादा लावत आहेत. त्याचबरोबर शाळेचे सर्व प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. शुल्क कमी करावे, अशी मागणी पालक करत आहेत. त्यावर शाळा पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्याची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर तीन महिन्यांची सॅलरी स्लिप आणून दाखवा, बँकेचे स्टेटमेन्ट आणून द्या, मग तुम्हाला शुल्क कमी करायचे की नाही ठरवू, असे काही शाळांनी सांगितले. अशा तक्रारी प्रामुख्याने पालकांनी केल्या होत्या.पालकांच्या तक्रारीनुसार महापालिकेने शहरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे खुलासा मागविला आहे. कोणत्या आधारावर शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे त्यांच्या बँकेच्या खात्याची माहिती मागविली, याचे स्पष्टीकरण देण्यास शिक्षण विभागाने सांगितले आहे.

--इंग्रजी शाळांच्या सर्वाधिक तक्रारी 

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षण सरू झाल्यापासून खासगी इंग्रजी शाळांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी या संदर्भात पालकांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये शुल्क भरले नाही म्हणूून विद्यार्थांचे ऑनलाइन शिक्षण बंद करणे, विद्यार्थांना शुल्काबाबत विचारणा करणे, आदी तक्रारी करण्यात आल्या होत्या.---

पालकांच्या बँक खात्याची तपासणी करणाऱ्या शाळांना खुलासा देण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. शाळेचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.शिं- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, प्रथमिक शिक्षण, पिंपरी-चिंचवड महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीbankबँक