केवळ राजकारणासाठी आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून ओबीसींना फंड मिळावा;छगन भुजबळ यांची अपेक्षा

By विश्वास मोरे | Updated: January 4, 2025 19:18 IST2025-01-04T19:16:00+5:302025-01-04T19:18:36+5:30

आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून फंड मिळावा, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

Not just reservation for politics, OBCs should get funds from the center and state | केवळ राजकारणासाठी आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून ओबीसींना फंड मिळावा;छगन भुजबळ यांची अपेक्षा

केवळ राजकारणासाठी आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून ओबीसींना फंड मिळावा;छगन भुजबळ यांची अपेक्षा

पिंपरी : आपल्याला जे हवे आहे ते माळी, वंजारी म्हणून मिळणार नाही ओबीसी म्हणूनच मिळेल. मात्र, आदिवासी व दलित ज्याप्रमाणे संघटित आहेत, त्याप्रमाणे ओबीसी संघटित नाहीत, अशी खंत व्यक्त करत असतानाच ओबीसींची मोट बांधण्याचे काम आपल्याला करावे लागेल. आईसुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही, हे लक्षात घेता सरकारला जागे करावे लागेल. ओबीसींना केवळ राजकारणासाठी आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून फंड मिळावा, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केले. दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, आमदार शंकर जगताप, रूपाली चाकणकर, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनमंत माळी आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, 'तुमचा आवाज नसेल तर उपयोग नाही. तुम्ही जिवंत आहात हे दाखविण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा लोक ते बंद पाडायला आले. लहुजी वस्ताद दांडके घेऊन उभे राहिले. ''

सावित्रीबाई पुरस्कार वितरण

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारार्थींमध्ये रुपाली चाकणकर (महिला राज्यभूषण), आशा तळेकर, मालती भुमकर (आदर्श माता), हभप भाग्यश्री भाग्यवंत (आध्यात्मभूषण), रेश्मा शेख (फातिमा सावित्री पुरस्कार), पूजाताई डोके (उद्योगभूषण), अनिता टिळेकर (आदर्श मुख्याध्यापिका), मंगल आहेर, वैशाली खराडे (आदर्श शिक्षिका), पूनम गुजर, सुवर्णा कदम, पल्लवी मारणे, रेश्मा कणसे, वंदना आल्हाट (समाज भूषण), संध्या स्वामी (संस्कारभूषण), रेणुका हजारे (साहित्यभूषण), हर्षदा भावसार (कलाभूषण), शुभांगी झोडगे (कार्यक्षम अधिकारी), महानंदा घळगे (श्रमभूषण), निलम चव्हाण (कर्तव्यभूषण), जया उभे (कायदाभूषण), संगीता येवला ( संगीत भूषण) यांचा समावेश होता.

हणमंत माळी, सूर्यकांत ताम्हाणे, हभप महादेव महाराज भुजबळ, अनिल साळुंके, अनिता ताठे, आशा माळी, उर्मिला भुजबळ, स्मिता माळी, अलका ताम्हाणे, पूजा साळुंके, शकुंतला शेवते, संगीता पाटील, कुंदा यादव, माया बर्के यांनी विशेष परिश्रम घेतले. अपर्णाताई डोके यांनी स्वागत केले. अध्यक्ष हणमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. महादेव महाराज भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत ताम्हाणे यांनी आभार मानले.

Web Title: Not just reservation for politics, OBCs should get funds from the center and state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.