पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 18:26 IST2018-12-30T18:25:24+5:302018-12-30T18:26:25+5:30

पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा कोयत्याने वार करून तसेच सिमेंट गट्टू मारून खून करण्यात आला.

murder of the young man | पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा खून

पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा खून

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दापोडीत तरुणाचा कोयत्याने वार करून  तसेच सिमेंट गट्टू मारून खून करण्यात आला. अल्विन रवी राजगोपाल (वय १९ , रा. जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमीची नावे आहेत. ही घटना दापोडी येथे रविवारी रात्री  दोनच्या सुमारास  घडली. पाच आरोपीविरोधात भोसरी पोलिसांकडे  गुन्हा दाखल झाला आहे. 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. भोसरी पोलीस ठाण्यात क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण (वय २६) रुपेश दिलीप संकपाळ (वय २०), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय २०), निखील ( वय २१) सनी गजभीव (वय २०, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) पांडुरंग गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी अल्विन रवी राजगोपाल यांच्यासह अन्य दोघांवर हल्ला केला. कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून केला. तसेच त्या सोडविण्यासाठी आलेल्या क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही मारहाण करून जखमी केले. याबाबत अधिक तपास भोसरी पोलिस करीत आहेत.
 
    पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. दगड, सिमेंट गट्टू मारून त्याचा खून केला. या याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत

Web Title: murder of the young man