Pimpri-Chinchwad: सासरवाडीत जावयाचा खून, तीन ते चार जणांकडून कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 07:52 IST2023-06-05T07:50:49+5:302023-06-05T07:52:17+5:30

ही घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली...

Murder of son-in-law in Sasarwadi stabbing by three to four people | Pimpri-Chinchwad: सासरवाडीत जावयाचा खून, तीन ते चार जणांकडून कोयत्याने वार

Pimpri-Chinchwad: सासरवाडीत जावयाचा खून, तीन ते चार जणांकडून कोयत्याने वार

पिंपरी : सासरवाडीत पत्नीसोबत फिरणाऱ्या पतीवर तीन ते चार अज्ञात आरोपींनी हल्ला करून खून केला. ही घटना रविवारी (दि. ४) मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. सूरज काळभोर (रा. आकुर्डी) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज काळभोर याचे एका महिन्यांपूर्वी गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी विवाह झाला. दरम्यान, रविवारी दुपारी सूरज पत्नीला घेऊन सासऱ्यांचा शेतात फेरफटका मारत होता. त्यावेळी तीन ते चार जणांची त्यांना गाठले. आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Murder of son-in-law in Sasarwadi stabbing by three to four people