शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: भरदिवसा सराईत गुन्हेगाराचा रस्त्यात अडवून खून; घेराव घालून चाकू, कोयत्याने सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 09:36 IST

पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ, नागरिकात भीतीचे वातावरण

पिंपरी : टोळक्याने दुचाकीवरून पाठलाग करून सराईत गुन्हेगाराला अडवले. त्यानंतर चाकू आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला. रहाटणी येथे औंध - रावेत मार्गावरील पुलावर बुधवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

रेहान अरिफ शेख (१९, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ऋतिक चव्हाण, प्रेम मोरे, दीपक कोकाटे आणि इतर अनोळखी चार संशयित व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेजस मनोहर हंसकर (१८, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. २) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस हे त्यांचा मित्र रेहान शेख आणि हर्षद काटे यांच्यासोबत दुचाकीवरून औंध - रावेत मार्गावरून रावेतच्या दिशेला जात होते. त्यावेळी संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. तीन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी फिर्यादी तेजस आणि रेहान यांचा रस्ता अडवून सर्वांनी घेराव घातला. त्यानंतर ऋतिक चव्हाण याने चाकूने रेहान शेख याच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. तसेच त्याच्या सोबत असलेल्या दीपक कोकाटे याने कोयत्याने रेहान याच्या मानेवर वार करून त्याला जिवे ठार मारले. 

भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेहान शेख याच्यावर पिंपरी -चिंचवड पोलिसांकडे वेगवेगळे गुन्हे आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbikeबाईकDeathमृत्यू