मोशीत गळा आवळून एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 17:52 IST2019-07-28T17:52:15+5:302019-07-28T17:52:56+5:30
माेशीत गळा आवळून एकाचा खून करण्यात आला आहे.

मोशीत गळा आवळून एकाचा खून
पिंपरी : गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रस्त्यावर टाकून दिला. मोशी येथे शनिवारी (दि. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर सोमनाथ बदनाळे (वय ४२, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बदनाळे यांचे घरमालक सुजित दत्तात्रय सस्ते (वय ४१, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून कशाने तरी गळा आवळून बदनाळे याचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोशी- आळंदी रस्त्यावर असलेल्या हवालदार वस्ती येथे त्याचा मृतदेह टाकून दिला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.