शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:27 IST

शाळांना दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या जाणार

पिंपरी : शहरातील आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी ६७३ शाळांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. ज्या शाळा सुरक्षा प्रमाणपत्र घेणार नाहीत, त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.शहरातील रुग्णालयांपाठोपाठ शाळांमध्ये अग्निसुरक्षेची काय व्यवस्था आहे, याची तपासणी अग्निशमन दलाकडून केली जाणार आहे. या कार्यवाहीचा पहिला टप्पा म्हणून शाळांना अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीमध्ये त्यांनी आगीपासून सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे व अन्य बाबी बसविणे, बसविलेली उपकरणे सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. शाळांना दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतरही शाळांकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आल्यास 'अग्निसुरक्षा अधिनियम-२००५' नुसार संबंधित शाळांविरोधात अग्निशमन दलाकडून कार्यवाही केली जाणार आहे.तीन हजार ८१२ शाळांना नोटिसा...महापालिका अग्निशमन दलाने आत्तापर्यंत अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासाठी शहरातील विविध तीन हजार ८१२ आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. ४८२ आस्थापनांची अग्निशमन दलाच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, तर १७२ जणांना व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

शहरात आगीच्या सातत्याने होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या सूचनेनुसार शाळांनी अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेतले आहे का, याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी पुढील आठवडाभरात शाळांना पत्र पाठविण्यात येणार आहे. - ऋषिकांत चिपाडे, उपाधिकारी, अग्निशमन विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाSchoolशाळाStudentविद्यार्थीfireआगFire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दल