मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग सामन्यावर सट्टा; दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:34 IST2023-04-11T10:33:35+5:302023-04-11T10:34:30+5:30

आरोपींकडून पाच मोबाइल फोन, वही, डायरी असा ५२ हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...

Mumbai Indians-Chennai Super Kings Match Bet; Both arrested by Pimpri-Chinchwad police | मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग सामन्यावर सट्टा; दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग सामन्यावर सट्टा; दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

पिंपरी : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मधील सामान्यांवर बेटींग करून पैसे कमविणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. अशा सट्टेबाजांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग या क्रिकेट सामन्यात मोबाइलद्वारे बेटींग घेणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींचे नाव नरेश जगन्नाथ अग्रवाल (वय ४०), विशाल राजू अग्रवाल (वय २४ दोघे रा. रिव्हर रोड, पिंपरी) अशी आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.८) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील पोलिस नाईक शैलेश गुलाब मगर यांनी रविवारी (दि.९) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाइल फोन, वही, डायरी असा ५२ हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Mumbai Indians-Chennai Super Kings Match Bet; Both arrested by Pimpri-Chinchwad police