शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी वर्चस्वाच्या हालचाली

By admin | Updated: April 17, 2017 06:41 IST

महापालिकेतील १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कट्टर विरोधक असणाऱ्यांना बरोबर घेतले

पिंपरी : महापालिकेतील १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कट्टर विरोधक असणाऱ्यांना बरोबर घेतले. वाट्टेल ते करून सत्तेचे समीकरण जुळविण्यात यशस्वी ठरल्यानंतर राजकीय वर्चस्व सिद्ध केलेल्या नेत्यांना आता शहरात गुन्हेगारीतील वर्चस्व दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. त्यातून घातपाताची मोठी घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी फेब्रुवारी २०१७च्या अगोदर भाजपात प्रवेश केला. नगरसेवक होण्याची इच्छा बाळगलेल्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रवेश केला, तर काहींनी व्यावसायिक समीकरणे जुळवून प्रवेश केला. ज्यांना संरक्षणाची गरज होती, त्यांनी आश्रय म्हणून भाजपाप्रवेशाचा मार्ग निवडला. जमीन खरेदी-विक्री व्यवसाय, त्यात कायदा-नियमांनाबगल देऊन केलेली कामे अशा गोष्टींना अभय मिळावे म्हणून एक प्रकारची तडजोड स्वीकारून काहीजण भाजपात आले आहेत. भाजपात प्रवेश न केल्यास सत्ता आल्यानंतर अडचण येऊ शकते, या भीतीने भाजपामध्ये आलेले अनेकजण आहेत. सत्ताबदल झाल्यानंतर आपला दोन नंबरचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो,या भीतीने आणि त्या व्यवसायास अभय मिळावे या उद्देशाने भाजपात दाखल झालेल्यांमध्ये काही दिग्गजांचाही समावेश आहे. अशा दिग्गजांमुळे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरलेले नेते अद्याप स्वत:ला ‘जो जिता वही सिकंदर’ मानण्यास तयार नाहीत. गुन्हेगारी क्षेत्रात वलय निर्माण केलेल्या दिग्गजांपुढे त्यांचे राजकीय वर्चस्व झाकोळत आहे. महापालिकेत कोणत्या भागातून किती नगरसेवक निवडून आणले, किती ताकत पणाला लावली. महापालिकेवर एकहाती सत्ता आणली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची वाहवा मिळवली, तरी गुन्हेगारी क्षेत्रात ज्यांचा दबदबा आहे, त्यांना दबकूनच वावरावे लागते, ही खंत त्यांना बोचते आहे. जमीन खरेदी-विक्रीत उलटसुलट व्यवहार करून भाजपाच्या आश्रयाला गेलेल्यांबद्दल काहींच्या मनात रोष आहे. (प्रतिनिधी)