मोटारीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 17, 2016 05:07 IST2016-06-17T05:07:57+5:302016-06-17T05:07:57+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोमाटणे हद्दीतील किलोमीटर क्र. ८८ जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला.

Motor tire bursts; One death | मोटारीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू

मोटारीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू

उर्से : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोमाटणे हद्दीतील किलोमीटर क्र. ८८ जवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला.
एकनाथ सुकत्या भोईर (वय ५९, रा.कृषी सहकारी गृहनिर्माण सोसायटी, वल्लभनगर, कल्याण, मुंबई वेस्ट) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे पुत्र वैभव एकनाथ भोईर (वय ३५) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ व वैभव भोईर हे दोघेही द्रुतगती महामार्गाने मोटार क्रमांक एमएच ०५ बीजे १८१४ यामधून जात होते. दरम्यान, मोटारीचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे मोटार दोन-तीन वेळा पलटली.
या अपघातात दोघेही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी निगडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एकनाथ भोईर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर वैभव भोईर यांच्यावर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: Motor tire bursts; One death