मुलाच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 18:48 IST2019-02-05T18:47:07+5:302019-02-05T18:48:46+5:30
पिंपळे सौदागर येथे मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून धक्का बसल्याने आईला ह्दयविकाराचा झटका आला.

मुलाच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू
पिंपरी : मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून धक्का बसल्याने आईला ह्दयविकाराचा झटका आला. त्यात तिचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना पिंपळे सौदागर येथे घडली.तन्मय दासगुप्ता (३६, रा. पिंपळे सौदागर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनैय्या दासगुप्ता (६५, पिंपळे सौदागर) असे त्याच्या आईचे नाव आहे.
तन्मय दासगुप्ता हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्यावर मागील काही वर्षांपासून मानसोपचार तज्ञाकडे उपचार सुरु होते. मात्र, त्याने मागील दोन महिन्यांपासून कोणतेही औषध घेतले नव्हते. त्यामुळे त्याची प्रकृती आणखी ढासळली होती. त्यानंतर सोमवारी रात्री त्याने त्याच्या राहत्या घरात संगणकाच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी तो दार उघडत नसल्याने त्याच्या खोलीचे दार उघडून पाहिल्यावर त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने त्याची आई सुनैय्या यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला.आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.