Molesting of youth girl and Threatens to throw acid on the face | विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची तरुणीला धमकी

विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची तरुणीला धमकी

ठळक मुद्दे आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : तरुणीची दुचाकी अडवून चावी काढून घेतली. त्यानंतर मारहाण करून झटापट करण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची तरुणाने धमकी दिली. पिंपरी येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. 
 याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि. १९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विष्णू साळवी (वय २२, रा. पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीच्या ओळखीचा आहे. तरुणी बुधवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दुचाकीवरून पिंपरी येथील डेअरी फार्म रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपी साळवी याने तरुणीची दुचाकी अडविली. त्यानंतर दुचाकीची चावी काढून घेतली. हाताने मारहाण करून झटापट करण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत घरच्यांना सांगू नये याकरिता चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Molesting of youth girl and Threatens to throw acid on the face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.