प्रपोज नाकारल्याने विद्यार्थिनीचा विनयभंग, बदनामी करण्याचीही धमकी; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 14:14 IST2022-11-04T14:13:39+5:302022-11-04T14:14:19+5:30

शिवीगाळ करून अश्लील बोलून तिचा विनयभंग....

Molesting and threatening to defame the student for refusing the proposal; Filed a case | प्रपोज नाकारल्याने विद्यार्थिनीचा विनयभंग, बदनामी करण्याचीही धमकी; गुन्हा दाखल

प्रपोज नाकारल्याने विद्यार्थिनीचा विनयभंग, बदनामी करण्याचीही धमकी; गुन्हा दाखल

पिंपरी : सोशल मीडियावरून तरुणाने प्रपोज केले. त्यास विद्यार्थिनीने नकार दिला. त्यामुळे शिवीगाळ करून अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. १) बावधन येथे घडली. श्रीराम बालाजी जकवाड (वय २९, रा. बावधन) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत एका विद्यार्थिनीने बुधवारी (दि. २) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादीसमोर सोशल मीडियाच्या अकाैंटवर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. मी शिक्षण घेण्यासाठी आले आहे, असे म्हणत फिर्यादीने त्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने फिर्यादीला सोशल मीडियावरून वाईट व अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.

त्यानंतर फिर्यादी यांनी ही बाब त्यांच्या मोठ्या भावास सांगितली. फिर्यादी यांच्या भावाने आरोपीला विचारणा केली असता आरोपीने त्यासदेखील शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीला फोन केला. तुला काही कळते का, तू तुझ्या या गोष्टी घरी कशाला सांगितल्या, असे म्हणत आरोपीने फिर्यादीला पुन्हा शिवीगाळ केली. मी तुझे व्हिडिओ बनवेल व कॉलेजमध्ये तुझी बदनामी करेल, अशी धमकी आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Molesting and threatening to defame the student for refusing the proposal; Filed a case